<
धुळे – (प्रतिनिधी) – शासनकारभारात पारदर्शकता यावी, नागरिकांचा सहभाग वाढावा,भ्रष्ट्राचार समूळ नष्ट व्हावा याउद्देशाने केंद्रशासनाने दिनांक 12 ऑक्टोबर 2005 रोजी माहीतिचा अधिकार अधिनियम-2005 लागू केला.या कायद्याच्या अमलबजावणीस दि.12 ऑक्टोबर 2019 रोजी 14 वर्ष पूर्ण होत आहेत.दरम्यानच्या काळात या कायद्याचा प्रभावी वापराने प्रशासनात परिणामी विकासात्मक कामात पारदर्शक असा बदल घडून आलेला आहे.त्यामुळे सामाजिक न्यायाची स्थापना होण्यास मदत झाली आहे. यासाठी माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करणारे जागृत नागरिक,त्यासाठी सतर्क राहणारे जनमाहिती अधिकारी,वेळोवेळी कायद्याची पार्श्वभूमी व स्पष्टता याविषयी मार्गदर्शन करणारे शासन या सर्वाचा यात अमूल्य असा सहभाग असल्याने या सर्वाचा ’12 ऑक्टोबर माहिती अधिकार कायदा वर्धापन दिनानिमित्ताने’विशेष सन्मान व्हावा,कायद्याची चौकट, कायद्याचा वापर कसा व कुठे व्हावा याविषयी चर्चा,मार्गदर्शन घडून यावे यासाठी राज्यस्तरीय माहिती अधिकार कार्यकर्ता शिबिर व सन्मान सोहळा-२०१९ धुळे आयोजित करण्यात येत आहे.
सदर सोहळा धुळे येथे अयोजित करण्यात येत असून माहिती अधिकार क्षेत्रात विशेष उल्लेखनिय असे दीर्घकाळ कार्य करणारे माहिती अधिकार कार्यकर्त्,मार्गदर्शक यांना’ विशेष पुरस्कार’ देऊन गौरविले जाणार आहे’ .त्यासाठी अशा कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्याचा तपशील, पेपर कात्रणे, पूर्ण परिचय व पत्ता दि.25 सप्टेंबर 2019 अखेर [email protected] या इ मेल वर पाठवावा. कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ स्वतंत्र कळविण्यात येईल. असे आवाहन युवकमित्र परिवार महाराष्ट्र राज्य, या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.