Wednesday, April 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची राजकीय पक्षांनी दक्षता घ्यावी-जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ अविनाश ढाकणे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची राजकीय पक्षांनी दक्षता घ्यावी-जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ अविनाश ढाकणे

जळगाव-दि. २३ (जिमाका वृत्तसेवा) – भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. या आचारसंहितेच्या नियमांचा भंग होवू नये यासाठी राजकीय पक्ष व उमेदवारांनी तंतोतंत पालन करावे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. अश्या सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज सकाळी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, निवडणूक तहसीलदार बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार श्री. मोरे, श्री. कळसकर यांचेसह विविध पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे नियम सर्वांनी समजून घ्यावे. सर्व राजकीय पक्षानी पक्षांचे बॅनर, होर्डिंग्ज, फलक, पोस्टर तत्काळ काढून टाकावेत. प्रचार साहित्य लावण्यापूर्वी संबंधित यंत्रणेची परवानगी घ्यावी. उमेदवारांचा प्रचार करतांना आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घ्यावात. विनापरवानगी कुठलेही प्रचार साहित्य, वाहने, सभा, बैठका घेवू नये. उमेदवारांचा वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स्‍ मिडीया, सोशल मीडियावर प्रचार करतांना माध्यम समन्वय व सनियंत्रण समितीची परवानगी घेणे आवश्यक आहे. वर्तमानपत्रातील जाहिराती प्रमाणित करुन घ्याव्यात. विना परवानगी जाहिराती प्रसिध्द केल्यास कारवाई करण्यात येईल असे सांगून उमेदवारांचा खर्चाचा दैनंदिन अहवाल निवडणूक शाखेस सादर करावा. त्याचबरोबर राजकीय पक्षांचे प्रचार कार्यालय सुरु करतांना वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. विधानसभेच्या निवडणूका शांततेत व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

            यावेळी उपस्थित प्रतिनिधींना निवडणूक काळात काय करावे, काय करु नये याबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कदम व  उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. हुलवळे यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आदर्श आचारसंहितेचे प्रत्येक विभागाने काटेकोरपणे पालन करावे-जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Next Post

आज परिवर्तन अभिवाचन महोत्सवात मुळ हिंदी लेखक अब्दुल बिस्मिल्लाह यांच्या दंतकथेचे अभिवाचन

Next Post
आज परिवर्तन अभिवाचन महोत्सवात मुळ हिंदी लेखक अब्दुल बिस्मिल्लाह यांच्या दंतकथेचे अभिवाचन

आज परिवर्तन अभिवाचन महोत्सवात मुळ हिंदी लेखक अब्दुल बिस्मिल्लाह यांच्या दंतकथेचे अभिवाचन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’;लाखोंची पारितोषीके; मालिकावीर ला मिळेल ‘पल्सर’

जळगाव क्रिकेट लिग ची रविवारी ‘ग्रॅण्ड फायनल’;लाखोंची पारितोषीके; मालिकावीर ला मिळेल ‘पल्सर’

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d