<
जळगांव – (प्रतिनीधी) – जिल्हा भरात जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत महिला समुपदेशन केंद्रे चालवली जात आहेत.या महिला समुपदेशन केंद्रात कार्यरत असणाऱ्या समुपदेशकांच्या पगारावर संस्था चालक डल्ला मारत असल्याची माहिती सत्यमेव जयते च्या हाती लागले आहे.
सविस्तर असे की, या समुपदेशन केंद्रात एम. एस. डब्ल्यू. पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी समुपदेशक म्हणून कार्य करीत आहेत. आधिच एम. एस. डब्ल्यू. च्या शासनस्तरावर पदभरती होत नाहीत त्यामुळे विद्यार्थी बेरोजगार राहण्यापेक्षा किंवा आवड म्हणून ही अशा समुपदेशन केंद्रात समुपदेशक म्हणून काम करत आहेत पण संस्था चालक यांच्या कडुन पगार झाल्यावर २००० ते ४००० रुपये पर्यंत चे प्रत्येकी समुपदेशकाकडुन कॅशमध्ये पैसे घेत असतात.समुपदेशकांचा पगार महिला व बालविकास विभागामार्फत त्यांच्या बँक खात्यावर जमा होत असतो तरी देखील संस्थाचालक पैसे उकळत आहेत. यामुळे मात्र समुपदेशकांची आर्थिक लुट होत आहे. याबाबत माहिती समुपदेशकांनी नाव न सांगण्याच्या अटिवर सविस्तर सांगितले आहे. त्यांनी हे देखील सांगितले की, आमचे नावे जर संस्था चालकांना समजली तर आम्हाला कामावरून कमी करण्यात येईल. या प्रकाराला आळा बसला पाहिजे अशी चर्चा आता समुपदेशकांमध्ये जोर धरु लागली आहे.