<
जळगाव-(प्रतिनिधी) – शहर विधानसभा क्षेत्राचे सतत दोन वेळेस निवडून आलेले लोकप्रिय आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) यांनी आज जळगाव शहरातून तिसऱ्यांदा दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ सोमवार रोजी दुपारी २:४० वाजता तहसील कार्यालय जळगाव येथे निवडणूक अधिकारी विनय गोसावी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
तत्पूर्वी सकाळी राजुमामांनी सपत्निक वसुबारसनिमित्त गोमातेचे पुजन केले व थोरामोठ्यांचे व ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. तसेच जळगाव शहरातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचे माल्यार्पण केले. दरम्यान सकाळी १०:०० वाजेपासून भाजपा कार्यालय जी-एम फाऊंडेशन येथे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती सुरु होती. ठीक १२:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला माल्यार्पण करून भव्य रॅलीला सुरुवात झाली. सुंदर असा भव्य रथ तयार करण्यात आलेला होता. या रथावर आ. राजूमामा भोळे यांच्या बरोबर ना. गिरीशभाऊ महाजन, ना. गुलाबराव पाटील, खा. स्मिताताई वाघ, महानगर जिल्हाध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील, शिवसेनेचे निलेश पाटील, सरिताताई माळी, आरपीआयचे अनिल अडकमोल, राजू सपकाळे, तसेच राजूभाऊ मोरे व महायुतीचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
सदर रॅलीमध्ये जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील, सामाजिक, उद्योजक व्यापारी व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते. या रॅलीमध्ये मामांचे जागोजागी औक्षण करून पुष्पगुच्छ देवून व्यापारी बांधव, उद्योजक व सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा त्यांचे स्वागत केले. सदर रॅलीमध्ये “कहो दिलसे राजूमामा फिरसे”, “जळगावच्या विकासासाठी पुन्हा राजूमामा” अशा घोषणा कार्यकर्ते व युवा मोर्चा यांच्या वतीने देण्यात येत होत्या.
सदरील रॅली रथ कोर्ट चौक, नेहरू चौक, जयप्रकाश नारायण चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, बळीराम पेठ मार्गे वसंत स्मृती भाजपा कार्यालय येथे समारोप करण्यात आला. याप्रसंगी आमदार राजूमामा यांनी मला पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारीची संधी दिल्याबद्दल देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी, प्रदेश अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे, ना.गिरीश भाऊ महाजन व पदाधिकारी तसेच जळगावची जनता यांचे आभार व्यत्त केले. यावेळी उपस्थित महायुतीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी आ. राजूमामा यांना एक लाख मतांनी विजयी करण्याचा संकल्प केरुन आज उमेदवारी अर्ज आ. राजूमामा भोळे यांनी दाखल केला.