Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/06/2026
in जळगाव
Reading Time: 1 min read
लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन
जळगाव, दिनांक 22 जून (जिमाका) :   शासनाच्या वित्त विभागांतर्गत विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील लिपीक वर्गीय गट ‘क’ कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

प्रशिक्षण दि. ०१ जुलै २०२६ ते दि. १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत एकूण ५० दिवस चालणार असून प्रशिक्षणामध्ये लेखा, वित्त तसेच शासनाच्या विविध संगणक प्रणालींविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रशिक्षणाचा निश्चित तपशीलवार अभ्यासक्रम जिल्हा कोषागार कार्यालय, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर व नंदुरबार येथे माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या प्रशिक्षण सत्रासाठी इच्छुक शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार असून प्रशिक्षणासाठीचे आवेदन पत्र व शिफारस पत्र दि. २५ जून २०२६ पर्यंत लेखा व कोषागारे कार्यालयास सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व शासकीय कार्यालयांतील इच्छुक तसेच नवनियुक्त कर्मचारी यांना संपूर्ण ५० दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. तसेच पूर्णवेळ प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणे शक्य नसल्यास विशिष्ट मॉड्युलनिहाय प्रवेश घेण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवावे, असे आवाहन लेखा व कोषागारे, नाशिक विभागाचे सहसंचालक बाबुलाल द. पाटील, सहसंचालक यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

Next Post

Next Post

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo