Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/08/2026
in क्राईम, जळगाव, तंत्रज्ञान, शैक्षणिक, सामाजिक
Reading Time: 1 min read
कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा, ता. पाचोरा (प्रतिनिधी : ईश्वर खरे) – येथून जवळच असलेल्या कासमपुरा येथील श्री राम-सीता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व सामाजिक जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात पोलीस उपविभागीय अधिकारी बापू रोहम तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती कल्याणी वर्मा यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेसह विविध सामाजिक, शैक्षणिक व वैयक्तिक विकासाच्या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अधिकाऱ्यांनी मोबाईलचा योग्य व मर्यादित वापर, वाढते सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव, महिला सुरक्षा, व्यसनमुक्तीचे महत्त्व, स्पर्धा परीक्षांची तयारी तसेच नियमित व्यायामाचे फायदे याविषयी सविस्तर माहिती दिली. सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा, अनोळखी व्यक्तींना वैयक्तिक माहिती देऊ नये, संशयास्पद लिंक किंवा संदेशांपासून सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

यावेळी विद्यार्थ्यांना शिस्त, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक विचारसरणी ही यशस्वी आयुष्याची गुरुकिल्ली असल्याचे सांगण्यात आले. शिक्षणाबरोबरच उत्तम आरोग्य, नियमित व्यायाम आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव जोपासण्याचे महत्त्वही अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रश्न विचारत अधिकाऱ्यांशी मुक्त संवाद साधला.

कार्यक्रमास सौ. मंगलाबाई परदेशी (पोलीस पाटील) तसेच नितीन परदेशी (माजी सरपंच) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण चौधरी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आनंद ढोणी, उपशिक्षक सतीश राजपूत, शिक्षिका श्रीमती सीमा पाटील व श्रीमती वर्षा भालेराव यांनी मान्यवरांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल परदेशी यांनी केले, तर मुकुंद आढाव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता, मोबाईलचा सुजाण वापर, महिला सन्मान, व्यसनमुक्त जीवनशैली आणि स्पर्धा परीक्षांविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व असून श्री राम-सीता विद्यालय सातत्याने विद्यार्थीहिताचे उपक्रम राबवून आदर्श शैक्षणिक वातावरण निर्माण करत असल्याचे उपस्थितांनी गौरवोद्गार काढले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

Next Post

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

Next Post
गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.