<
सध्याचे वातावरण बघता महाराष्ट्रात राजकारणामुळे वातावरण चांगलंच तापलय तर हल्लीच झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ( पावसामुळे ) शेतकऱ्याच्या घरातील वातावरण कमालीचं थंडावल आहे. काही शेतकरी तर हवालदिल होऊन आत्महत्या करीत आहे. तर काही कर्जाच्या बोझ्याखाली दबले आहेत, शेतकऱ्यांची इतकी गंभीर परिस्थिती असून कोणाला त्याबद्दल बोलायचं नाही , त्याउलट सगळ्यांना ह्याच गोष्टीत रस आहे की कोनाच सरकार येणार , कोन मुख्यमंत्री बनणार, फोडाफोडीच राजकारण वगैरे विषयच सगळ्या तरुण व प्रौढांच्या गप्पांचे विषय बनले आहे .
सध्याची परिस्थिती बघता सरकारी नौकरी मिळणे महाकठीण काम झाल्याचे चित्र दिसते , तर रोजगाराचे तीनतेरा संपूर्ण देशातच वाजल्यावजे दिसते. सर्वच क्षेत्रातील सरकारी नौकऱ्यांचे खाजगीकरण होताना सर्वच बघत आहे. त्यामुळे तरुण बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे . सर्वत्र दिसणाऱ्या खाजगिकरनामुळे तरुणांमध्ये नाराजी तर आहेच, पण आळशीपणाचे प्रमाण सुद्धा वाढले, त्याचे कारण असे की खाजगीकरनामुळे सरकारी नौकार्या घटल्या व तेच काम कमी दरात / पगारात हुकूमशाही पद्धतीने करावे लागत असल्याने वेळ वाया जातो , आपल्या शिक्षणाच्या लयकीच काम अतिशय तोडक्या पैशात करावं लागत आल्यामुळे कुठेतरी आपली इज्जत कमी होते , आपला स्वाभिमान दुखवल्याच समजते , त्यामुळे कोणतंच काम न करता योग्य संधीची वाट पाहत तरुण बघत असतात पन देवच जानो ती संधी कधी येईल.
तरुणांची नैतिक जबाबदारी
आपल्या आईवडिलांचे तृण फेडण्यासाठी त्यांच्या म्हातारपणात त्यांच्या हातची काठी होऊन त्यांची काळजी घेणं हीच खऱ्या अर्थाने परतफेड म्हणता येईल . आपल्या परिवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करने हीच तरुणांची पहिली नैतीक जबाबदारी आहे . पण तरुणाच्या हाताला कामच नसल्यामुळे आईवडिलांच्या जीवावर तरुणांचा निर्वाह भागत आहे.
आताचा तरुण वयाची ३०शी चार करूनही बेरोजगार आहे अशातच बायकपोरांची जबाबदारी सुद्धा म्हाताऱ्या आई वडिलांवर निष्क्रिय तरुण आपल्या शान-शौकतीच्या गोष्टी कट्ट्यावर करताना दिसतात . ते काम चांगलं आहे पण पगार कमी आहे, अमुक काम माझ्या शिक्षणाच्या लेव्हलच नाही , तिथे कमी पगारात जास्त काम आहे , आपल्याला कोनाच्या हाताखाली काम करणं पसंत नाही. आदी चर्चाना उत येतो. शहरातील कंपनीत पगारच कमी आहे, मी कंपनीत गेलो तर घरच काय होईल. अशा सर्व व्यर्थ चिंतामध्ये तरुणाई गप्पांचा फड रंगविते.
तरुणांनी जबाबदारी स्वीकारण्याची गरज
तरुणांनी आपला फलतूचा अहंकार सोडून आपल्या परिवाराची , मुलांच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारून काम करावी. बेरोजगारीच्या गप्पा मारण्यापेक्षा मिळेल ते काम कोणतीच लाज न बाळगता योग्य मोबदल्यात करून आत्तापासूनच आपले भविष्य घडवायला सुरुवात करावी. आपापल्या शिक्षणच्या लयकीच काम करावे , काही छोटे-मोठे व्यवसाय करावे त्यामुळे आपला उदरनिर्वाह होईल पण सोबत काही लोक आपल्या मुले त्याच्या परिवाराचा पालन पोषण करतील त्यांना रोजगार उपलब्द होईल.आपन इतरांचे पाय न खेचता उलट मदतच करावी. यामुळे त्यांना कामाचा आळस नाहीसा होईल , कामाची सवय लागेल व आपल्या परिवाराची जबाबदारी पेलण्यास मदत होईल. बहिणाबाई चौधरी यांच्या कविते प्रमाणे “आरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताले चाटका मग मिळते भाकर” या ओवी प्रमाणे मिळेल ते काम करण्याची किंवा व्यवसाय करण्याची मानसिकता तयार करण्याची गरज आज पिढीच्या तरुणात जागृत होण्याची काळाची गरज भासत आहे. जेणेकरून आपली, आपल्या परिवाराची व प्रामुख्याने आपल्या देशाची उन्नती होईल. म्हणून म्हनवस वाटत की उठ तरुना जागा हो देशाच्या प्रगतीचा धागा हो
लेखक
आकाश भालेराव
रा. शेमळदे पो. मेळसांगवे ता . मुक्ताईनगर जी. जळगाव