<
वाढदिवस निमित्ताने एरंडोल शिक्षण विभागातर्फे सत्कार
एरंडोल(प्रतिनीधी)- तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळांमध्ये स्वेच्छेने सर्वप्रथम तळई येथे सेमी इंग्रजी माध्यमांची सुरुवात करणारी तसेच जि.प. शाळा टिकविण्यासाठी व पटसंख्या वाढविण्यासह जि.प. शाळा विषयी ग्रामीण भागातील पालकांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी स्वयंप्रेरणेने स्वतःच्या दोन्ही मुलांना वाढत्या खाजगी माध्यमाच्या इंग्रजी शाळांच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळेतच पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण देणारे किशोर पाटील कुंझरकर यांचा ४० वाढिवसानिमित्त एरंडोल पं.स. शिक्षण विभागाच्यावतीने तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार व यथोचित सन्मान करून गौरव करून भावी वाटचालीसाठी शिक्षण विभागाच्या वतीने आपल्या दालनात शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नारायण बोरसे, अल्लाउद्दीन शेख, मराठी शाळा व उर्दू शाळांच्या शिक्षक मित्र परिवार उपस्थित होते. किशोर पाटील कुंझरकर हे मनमाड व अभ्यासू व सर्वांना सोबत घेऊन चालणारे लाडके व्यक्तिमत्व असून महाराष्ट्र राज्यातील शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तसेच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव म्हणून काम करीत असताना शैक्षणिक प्रश्न सोबतच गुणवत्ता वाढविणे, कार्यात नवनवीन प्रयोग करीत असतात. असे यावेळी विश्वास पाटील म्हणाले. वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिक्रिया दिली असून सार्वजनिक जीवनातील एक धडपडणारा शिक्षक व सामाजिक क्षेत्रातील कृतीशील नेतृत्व म्हणजे किशोर पाटील कुंझरकर असल्याचे त्यांनी म्हटले.