<
जळगांव(प्रतिनीधी)- येथील काशीबाई ऊखाजी कोल्हे विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुज्य साने गुरुजी यांच्या प्रतीमेचे पुजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक रजनीकांत कोठारी हे होते तर प्रमुख पाहुणे साहित्यिका सिमाताई भारंबे यांची उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी “पुल व मुल” या साधना हस्तलिखीताचे अध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी १०वी, १२वी, स्काँलरशीप, NMMS या वर्गात प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. तसेच रजनीकांत कोठारी यांच्या कडुन विद्यालयातील ५०० गरीब गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ जे. आर. गोसावी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बि. बि. देवरे व सौ. यु.जे. पाटिल यांनी केले तर आभार एच. जी. काळे यांनी मानले. कार्यक्रमास उद्योजक चेतन पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष चंदन अत्तरदे, चिटणीस अवधूत पाटील, उपचिटणीस एस. डी. खडके, संचालक यशवंत कोल्हे, बक्षिसदाते विष्णू वाणी, उपमुख्याध्यापक ए.व्ही. बडगुजर, सौ बि.एस. राणे, सौ पि.ए. पाटिल, सौ निर्मला चौधरी, सौ शालिनी भारंबे, जि.बी. पवार, व्ही.आर. कोल्हे आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.