<
कबीर नेहमीच वचिंताचा आधार कबीर हा सर्वव्यापी संत आहे , भारतात कबीरांची भजन सर्वत्र गायली जातात . विशेष म्हणजे कबीर जनमानसा मध्ये रुजलेला आहे . इथल्या वंचित ,शोषित समुहाला कबीर नेहमी आपला वाटला , त्यांनीच कबीर सांभाळला आहे अस सांगत शबनम विरमानी यांनी कबिराच मोठेपण अधोरैखित केल .
जळगाव – (प्रतिनिधी) – संजीवनी फाउंडेशन संचालित परिवर्तन आयोजित भाउंना भावाजंली परिवर्तन कला महोत्सवाच्या 5 व्या दिवशी जगप्रसिद्ध गायिका शबनम विरमानी यांच्या सोबत ‘कबीर और हम’ या विषयावर चर्चात्मक कार्यक्रम जैन हिल्स येथील , परिश्रम सभागृहात पार पडला.
या कार्यक्रमासाठी रा रा भालचंद्र नेमाड़े , कविवर्य ना.धो. महानोर , कवि अजय कांडर , लेखक रफ़ीक़ सूरज , महोत्सव प्रमुख अनीलभाई कांकरिया , अमरभाई कुकरेजा , अनिषभाई शहा , नंदलाल गादिया , सुदीप्ता सरकार, सुलोचना पाटिल , श. दी.वढोदकर , सोनाली पाटिल , नितिन रेदासनी , दिलीप जोशी , रेखा पाटिल , जितेंद्र कोठारी ह्यांच्या सह मान्यवर उपस्थित होते . संगीता राजेनिबाळकर या विशेष अथिति म्हणून उपस्थीत होत्या.
एक आध्यात्मिक संगीत मैफ़िलीचा अनुभव आज सर्व श्रोत्याना अनुभवाला येत होता . जीवनाकडे बघण्याचा अत्यंत सुंदर दृष्टिकोन , आपली परंपरा , आपली संस्कृती याचा शोध घेतला जात होता . आपली परंपरा रक्षणाची नाही कारण रक्षण आल की स्वामित्वाची भावना येते .,आपली परंपरा जपन्याची आहे . या मुळे भारतीय संस्कृती थोर आहे.
महाराष्ट्राला संताची थोर परंपरा आहे , वारकरी परंपरे मुळे इथले आध्यात्मिक भरण पोषण झाले आहे . पण तरी सुद्धा निर्गुणी भक्ती सांगणारा कबीर हा संत देखील महाराष्ट्राला खुप जवळचा आहे . कुमार गंधर्व यांची निर्गुणी भजन असतील , गावागावा मध्ये असलेली भजनी मंडळ यांनी कबीर सर्वसामान्य माणसाच्या हृदयात स्थापित केला . एक अशिक्षित माणूस इतक थोर तत्वज्ञान कस मांडतो याच कुतूहल सगळ्यांना आहे .जो स्वतःला वीणकर मानतो या मुळे त्यांच्या कविते मधील रूपक ही चादर , तंबोरा , घट अशीच येतात. आपल्या जगण्यात असलेल द्वैत समजून घेत अद्वैताची मांडणी करणारा हा सर्वकालिक थोर कवी सगळ्यांना आपला वाटला . त्याची काही सुंदर उदाहरण शबनम यांनी दिली.
प्राकृत भाषेतल्या रचना सर्वसामान्य माणसाला आपल्या वाटल्या , ही भाषीक कृती ही देखील कबिराची मोठी उपलब्धी आहे अशी मांडणी नेमाड़े दादा यांनी केली .
मानवी जीवन व दुःख याच घट्ट नात आहे . दुःख आहे म्हणून माणूस , माणूस आहे . जैन व झेन तत्वज्ञाना मधील एक रुपक आहे . वर पशु , खाली साप या मध्ये माणूस अडकला आहे , मधमाश्या डंख मारता आहेत . हे सगळ सुरु असताना मधाच्या पोल्या मधून एक थेंब मधाचा मुखात पडतो ,बस हेच जीवन आहे . क्षणभर सुख व मणभर दुःख है जीवनाच दर्शन म्हणजे कबीरवाणी आहे.
सीसा या पंजाबी लोककथेचा दृष्टांत सांगत त्यांनी एक सिंधी भजन इतक सुंदर गायल की सर्वांचे डोळे पाणावले होते .
परिवर्तन कला महोत्सव हा केवळ करमणुक नाही तर ही त्या सोबत वैचारिक प्रबुद्धता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे . अशी भावना महानोर दादा यांनी व्यक्त केली . या कार्यक्रमा साठी जैन उद्योग समुहाची मोलाची मदत झाली .