<
जळगाव (धर्मेश पालवे)- नवनवीन तंबाखू कंपनी, गुटखा, आणि बिडी व सिगारेट च्या अति वापराणे कर्करोग आपलं डोकं वर काढत आहे।सरकार कडून विविध माध्यातून तंबाखू, गुटखा बंदी करीता अभियान राबण्यात येत आहेत।एवढंच काय शालेय व महाविद्यालयीन तरुणांना समुपदेशन घडवून त्यांना मूळ प्रवाहात आणले जाण्याचे रेकॉर्ड्स ही आहेत.अश्या कर्करोग ग्रस्त रुग्णासाठी दूर दूर पर्यंत इलाज करण्यासाठी जावे लागत असते।म्हणून महाराष्ट्रात सर्वच सरकारी रुग्णालयाच्या कर्करोग तज्ञाना (ऑन्कोलॉजिस्ट) महाराष्ट्र सरकारने आर्टिफिशियल इंटेलिजन्स यंत्रणेने जोडले आहेत.यामुळे महाराष्ट्रतील कोणत्याही कानाकोपऱ्यात उपचारासाठी सरकारी रुग्णालयात आलेल्या रुग्णास पुणे, नाशिक, औरंगाबाद व मुबई तील मोठ्या रुग्णालयात मिळतात तसेच उपचार त्यांना तेथे उपलब्ध होणे अनिवार्य आहे.
आजाराच्या लक्षणांवरून एआय यंत्रणा लागू करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने गेल्या आठवड्यात आयबीएम वॅओट्सन गृपसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सर्वच प्रमुख कर्करोग तज्ञाना बोलावले गेले होते. डॉक्टर किंवा रुग्ण दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी या यंत्रणेची मदत घेऊ शकतात आणि एआय यंत्रणा डॉक्टरांना या रुग्णावर कसा उपचार करायचा याचा सल्ला बसल्या जागी देऊ शकते, अशी व्यवस्था व यंत्रणा राबवणे,आणि रुग्णांना होणारा प्रवास, तपासणी, आणि विमर्ष खर्च आटोक्यात आणला जावा अपेक्षित असताना ,मात्र कुठेही सरकारी रुग्णालयात या या विषयी माहिती नाही ,आणि नाही कुनाही कर्करोग विभाग, व डॉक्टरांना वा रूग्णालयाला माहिती नाही असं चित्र आहे.
देश भरातून दरवर्षी कर्करोग चे 12लाख नवीन रुग्ण आढळतात तर दर वर्षी आठ लाख कर्करोग रुग्ण मृत्यूमुखी पडतात. वाढती व्यसनाधीनता व कर्करोग रुग्णाचा मृत्यूदर याकडे वैद्यकीय मंत्री आणि कर्करोग तज्ञाणी लक्ष देणे आवश्यक आहे.सरकारी योजना आणि उपाययोजना याचा अवलंब करून लवकरात लवकर रुग्णांना फायदा करून द्यावा अशी ठोस पावलं उचलून जिल्ह्यातील रुग्णांना दिलास द्यावा ही रुग्नाकडून म्हटले जात आहे.