<
जळगाव:- आज कोरोनाच्या धास्तीने सारं जग भयंकर अशा भीतीच्या सावटाखाली वावरत आहे. सगळीकडेच चर्चा आहे ती फक्त आणि फक्त कोरोनाचीच.टीव्ही, वर्तमानपत्र, फेसबुक, व्हापस्अप,यासारखी सोशल मिडिया, आपसातल्या गप्पा, फोनवरची चर्चा कुठेही जा,जिकडेतिकडे कोरोनाचीच चर्चा…..त्यात भरीस भर म्हणून कोरोनाबाबतचे समज गैरसमज,चुकीची माहिती,फेक बातम्या यांचा तर सुकाळ झाला आहे. ज्याला काही कळत नाही तो सुध्दा एखाद्या तज्ज्ञाच्या आविर्भावात आपल्या अकलेचे दिवे पाजळतो आहे.त्यामुळे आधीच गंभीर असलेली परीस्थिती आणखीच गंभीर होते आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊनमुळे घरात बसून अनेकांचे मानसिक संतुलन बिघडते आहे. त्यातून कौटुंबिक विसंवाद, आपसातील मतभेद,भांडणे, मनाची अस्वस्थता, चिडचिड वाढते आहे.वयोवृद्ध, आजारी, गर्भवती महिला, लहान मुले, दिव्यांग यांना जास्त त्रास सहन करावा लागतो आहे.त्यातल्या त्यात मधुमेह, ह्रदयविकार,उच्च रक्तदाब यासारख्या आजाराने त्रस्त ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका जास्त आहे.
त्यामुळे अशा व्याधींनी ग्रासलेल्या रूग्णांना दिलासा देण्यासाठी, त्यांच्या मनातली भीती घालविण्यासाठी
“क्रुती”चे वैद्यकीय आघाडी प्रमुख तसेच “माधवबाग “चे अनुभवी व तज्ज्ञ डॉ.श्रद्धा माळी व डॉ.श्रेयस महाजन हे रूग्णांनी लाँकडाऊनच्या काळात कोणती काळजी घ्यावी, आहार,व्यायाम, निद्रा याबाबत मानसशास्रीय स्तरावर समुपदेशन करून मोफत मार्गदर्शन करीत आहेत.
लाँकडाऊनमुळे मधुमेह, ह्रदय रोग,उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी त्रस्त असलेले अनेक रूग्ण नियमित उपचार घेण्यासाठीसुध्दा दवाखान्यात जायला घाबरताहेत.अशा रुग्णांसाठी हे मार्गदर्शन एक वरदान ठरते आहे.