Sunday, April 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/04/2026
in जळगाव, राज्य, विशेष
Reading Time: 1 min read
बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

जळगाव दि. १० :- समता सप्ताहानिमित्त समाज कल्याण विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा व महिला मेळावा उत्साहात संपन्न झाला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताहाच्या औचित्याने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाला बचत गटातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रोबेशनरी ऑफिसर वृषाली चौरे यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून अधिकारी पदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उलगडत महिलांना आत्मविश्वासाचा संदेश दिला. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जळगावचे धीरज श्रीनिवास पाटील यांनी ‘स्टँड अप इंडिया’ योजनेची सविस्तर माहिती देत कर्ज प्रक्रियेतील सुलभता स्पष्ट केली. ‘बँक सखी’ रंजना सोनवणे यांनी आपल्या अनुभवातून महिलांना होणाऱ्या फायद्यांवर प्रकाश टाकला. तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक ल. गो. तावडे यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व नवउद्योगांच्या संधींबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या हस्ते बचत गटातील महिलांना भारतीय संविधानाची उद्देशिका व ‘महात्मा फुले यांचे समग्र वाड्मय’ पुस्तके भेट देऊन गौरविण्यात आले. महिलांची केवळ आर्थिक नव्हे तर वैचारिक प्रगती व्हावी, हा या उपक्रमामागील उदात्त हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले. “महिलांचे आर्थिक सक्षमीकरण ही काळाची गरज असून, समाज कल्याण विभाग त्यासाठी कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन करून ‘मर्जिन मनी’ योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्यात सहभागी झालेल्या महिलांनी शिलाई, खानावळ, शेतीपूरक व्यवसाय व लघुउद्योगांच्या माध्यमातून साधलेली प्रगती मांडली. स्वावलंबनाच्या वाटेवर आत्मविश्वासाने वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विशेष अधिकारी समाज कल्याण अमोल कुलकर्णी, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारीविशाल राठोड, कार्यालय अधिक्षकराजेंद्र कांबळे , वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक अजय ठाकूर यांचेसह समाज कल्याण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जळगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

Leave a ReplyCancel reply

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

बचत गटांच्या महिलांसाठी ‘मर्जिन मनी’ कार्यशाळा उत्साहात; आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जळगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जळगाव येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न;सहकाऱ्यांच्या सामूहिक जपातून विश्वशांतीची प्रार्थना

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न;सहकाऱ्यांच्या सामूहिक जपातून विश्वशांतीची प्रार्थना

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे सामाजिक न्याय भवनात उत्साहात उद्घाटन

रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे डोंगर; शिरसोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात!

रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे डोंगर; शिरसोलीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे आरोग्य धोक्यात!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d