जळगाव -(प्रतिनिधी )- दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी धानोरा येथे तालुका जिल्हा जळगाव येथे लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथील एम एस डब्ल्यू द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रकार्य अंतर्गत महिलांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी कायदे व समुपदेशकाची भूमिका जबाबदारी या विषयावर आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर संचलित, महिला व बाल सहाय्यता कक्षा च्या समुपदेशक श्रीमती विद्या सोनार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथील प्रा. डॉ. अस्मिता सरवैया यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयातील वरिष्ठ प्रा डॉ. शाम दामू सोनवणे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजा मोरे या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला धानोरा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पॉक्सो कायद्याविषयी तसेच ग्रामस्थ महिलांना महिलांचे अधिकार, महिलांसाठीचे कायदे, कौटुंबिक हिंसाचार कायदा आणि इतर काहीद्यांविषयी श्रीमती विद्या सोनार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी प्रा डॉ. अस्मिता सरवैया यांनी महिलांच्या दुहेरी भूमिकेबाबत मार्गदर्शन करत असताना सांगितले की, दैनंदिन जीवनातील अनेक संघर्षमय प्रसंगी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.

सक्षम नारी असली तरच देश सक्षम होईल, यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ शाम सोनवणे यांनी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले व धानोरा गावातील महिला, पुरुष, बालके या सर्व घटकांच्या विकासासाठी विद्यार्थी समुदाय संघटन आणि समुदाय विकास या समाजकार्याच्या पद्धतीचा उपयोग करून विकास प्रक्रिया समजून घेण्यासाठी महाविद्यालयाकडून त्यांची नेमणूक झालेली आहे. त्यांच्या या प्रशिक्षण कालावधीत गावकऱ्यांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची सरोदे तर आभार प्रदर्शन सुनील गांगुर्डे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा.डॉ. शाम सोनवणे व क्षेत्रकार्य पर्यवेक्षक प्रा डॉ नितीन बडगुजर यांच्या मार्गदर्शनातून बी.एस.डब्ल्यू तृतीय वर्ष व एम. एस. डब्ल्यू वर्षाचे विद्यार्थी प्राची सरोदे, पूजा मोरे, सुनील गांगुर्डे, ज्योत्स्ना महाजन, रेहाना तडवी, गायत्री कुंभार, विशाल पावरा विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.











