Friday, October 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/09/2026
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव, दि. 3 (जिमाका) –: राज्य सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्नित अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील ५,०१२ रिक्त पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून, भरती प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णयाद्वारे सूचना जारी केल्या आहेत असे उच्च शिक्षण जळगाव विभागाचे सहसंचालक डॉ. पराग मसराम यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.

नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर जाहिरातीचा मसुदा संबंधित विद्यापीठाच्या मान्यतेसाठी सादर करणे, जाहिरातीत शैक्षणिक पात्रता व सामाजिक आणि समांतर आरक्षणाची अचूक माहिती नमूद करणे बंधनकारक आहे. विद्यापीठाची मान्यता मिळाल्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध करता येणार असून, राष्ट्रीय व राज्यस्तरीय वृत्तपत्रात जाहिरात देण्याच्या सूचना आहेत.

उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज स्वीकारणे बंधनकारक असून, ऑफलाइन अर्जांचीही तरतूद करण्यात आली आहे. शॉर्टलिस्टिंगसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्धारित केलेले निकष वापरणे, शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी व गुणांकनाचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

मुलाखतीचे संपूर्ण CCTV रेकॉर्डिंग करून ते किमान एक वर्ष सुरक्षित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवड समितीची रचना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसूचना व शासन निर्णयानुसार करावी लागणार असून, विद्यापीठाची मान्यता मिळाल्यानंतर अंतिम निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

“सहाय्यक प्राध्यापक पदभरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, नियमानुसार आणि उमेदवारांच्या दृष्टीने विश्वासार्ह व्हावी, हा शासनाच्या नव्या सूचनांचा मुख्य उद्देश आहे,” असेही सहसंचालक डॉ. मसराम यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लोहारा विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात संपन्न 

Next Post

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

Next Post
तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo