एरंंडोल – (प्रतिनिधी) – तालुक्यातील खडके बु ll येथिल अनाथ निराधार मुला मुलींच्या बालगृहात कुसुमताई फौंडेशन जळगाव या उपक्रमशिल संस्थेच्या माध्यमातुन व अध्यक्ष श्री.सागर सपकाळे यांच्या संकल्पनेतुन रक्षाबंधन साजरे करण्यात आले सुरूवातीस मुली आणी मुल यांनी झाडाची पुजा करुन राखी बांधली आणि वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली नंतर बालगृहातील मुलींनी मुलांचे औक्षण करून त्यांना राख्या बांधल्या व शुभेेच्छा दिल्या. नंतर सागर सपकाळे यांनी मुलांजवळ शैक्षणिक साहित्य ठेवण्याचे पाऊच आणि टिकलींचे पाकिट दिले . हे साहित्य मुलांनी ओवाळणीबद्दल मुलींना दिले .नंतर सर्व मुलामुलींना सफरचंद केळी फळे वाटप केले. अक्षय जोशी,नरेंद्र शेजवळ,उमेश भालेराव,दिपक वाणी,चेतन धमके राकेश भोई यांना मुलींनी राख्या बांधल्या.
संस्थाचालक श्री.प्रभाकर पाटील ,अधिक्षक मधुकर कपाटे यांनी कुसुमताई फौंडेशन आणि उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी
अधिक्षक प्रमोद पाटील, तुषार अहिरे,गणेश पंडीत,ज्ञानेश्वरपाटील,हेमंत पाटील,उज्वल पाटील,सारीका पाटील,शुभांगी पाटील यांनी परिश्रम घेतले.