<
जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) :- कृषि विभागाने आता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाव्दारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. या प्रणालीव्दारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य, भरडधान्य, पौष्टीक तृणधान्य व कापुस विकास कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्रय देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरीता अर्ज करावयाचा आहे.
योजना औजारे व अनुदान मर्यादा रक्कम खालील प्रमाणे
कडधान्य – पेरणी अर्ज- 16,000-20,000/- , रीज फरो प्लांटर- 60,000/-75,000/-, रोटाव्हेटर-40,300-50,400/-, बहुपिक मळणी यंत्र – 2,00000-2,50,000/-, पॉवर टिलर – 70,000-85,000/-, पाईप –रु. 20 प्रती मीटर, पंपसंच -10,000/-,
भरडधान्य – मका सोलणी यंत्र- 10,000-1,00000/-
पौष्टीक तृणधान्य – रीपर – 75,000/-, थ्रेशर – 40,000/-, कापुस विकास कार्यक्रम – कॉटन श्रेडर – 80,000-1,00000/-
कृषि यांत्रीकीरण उपअभियान/ राज्य पुरस्कृत कृषि यांत्रीकीकरण/ राष्ट्रीय कृषि विकास योजना – पॉवर नॅपसॅक स्प्रेअर / ट्रॅक्टर ऑपरेटेड स्प्रेअर – 3,000-1,25,000/-
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बंधुनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक आपल्या आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे.
महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/ हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा शेतकरी स्वत:च्या मोबाईल, संगणक / लॅपटॉप/ टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC) ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतील वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करुन त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापुर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करुन प्रमाणित करुन घ्यावा लागेल त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.
पोर्टलवरील प्राप्त अर्जांची ऑनलाईल लॉटरी, पुर्व संमती देणे, मोका तपासणी तसेच निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे इ. सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यापूर्वीच अर्जदारानी माहिती भरली असल्यास पुन्हा भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी बदल करु शकतात. ज्या शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर कृषीविषयक योजनाचा लाभ मिळवण्यासाठी अद्याप अर्ज केला नसेल, त्यांनी आपले अर्ज पोर्टलवर भरावेत सर्व इच्छुक शेतकऱ्यांनी महा –डीबीटी पोर्टलवर नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.