कृती फाउंडेशन व ए वन्स इव्हेंट्सचा स्तुत्य उपक्रम; गरजूंच्या चेहऱ्यावर उमलले हसू
जळगांव(प्रतिनिधी)- सर्व देशावर कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संकट ओढवले आहे. त्यातच सध्या कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने ती लहान मुलांसाठी सर्वात धोकेदायक असल्याने शासनाने लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पण, मागील दिड वर्षांपासून सुरु असलेल्या सततच्या लॉकडाउन मुळे सामान्य नागरिकांसह मजूर वर्ग हवालदिल झाला आहे. या परिस्थितीमुळे त्यांचं जगणं अवघड झालंय, या सर्व परिस्थितीत आपला संसाराचा गाडा चालवत असतानाच आपल्या लहान मुलांची काळजी कशी घेणार? हे मोठं संकट त्यांच्या समोर उभं राहिलंय. अजूनही बरीचशी कुटुंब आर्थिक...