राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत डाळ वाटप
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई, दि. १० मे : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल...
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई, दि. १० मे : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल...
आदिवासी विकास मंत्री ॲङ के.सी. पाडवी यांनी साधला आजी-माजी लोकप्रतिनिधीं सोबत संवाद मुंबई, दि,. १० : लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावल्यामुळे अनेक आदिवासी कुटुंबांसमोर आर्थिक संकट आले आहे. अशावेळी त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागमार्फत खावटी अनुदानाच्या स्वरुपात मदत देणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲङ के. सी. पाडवी यांनी आज विविध जिल्ह्यातील आदिवासी जमातीतील लोकप्रतिनिधींसोबत बोलताना दिली. तसेच विविध राज्यात व जिल्ह्यात अडकलेल्या आदिवासी बांधवाना सुखरूप त्यांच्या मूळ गावी मोफत परत आणण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांनी आज राज्याच्या विविध जिल्ह्यातील आदिवासी जमातीच्या आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच समाजातील मान्यवरांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. सुरुवातीस गोंदिया जिल्ह्यातील माजी आमदार दिवंगत श्री.रामरतन राऊत यांना तसेच औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पडलेल्या मध्य प्रदेशातील आदिवासी मजुरांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी श्री.पाडवी यांनी, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे आदिवासी मजुरांच्या, शेतकऱ्यांच्या समोर अनेक आर्थिक समस्या उभ्या राहिल्या आहेत. या समस्यांचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकप्रतिनिधींना दिली. स्थलांतरित मजुरांना, विद्यार्थ्यांना ,नोकर वर्गांना त्यांच्या मूळ गावी मोफत पोहोचवण्यासाठी आदिवासी विकास विभागाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहितीही त्यांनी दिली. सध्या रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली असून याबाबत रोजगार हमी योजनेच्या विभागाला आवश्यक ते निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. आदिवासी भागातील प्रत्येक जिल्ह्यातून उद्भवलेल्या प्रश्नांची माहिती अॅड.पाडवी यांनी लोकप्रतिनिधींकडून जाणून घेतली. आदिवासी भागांमध्ये रेशन कार्ड नसलेल्या अनेक आदिवासी कुटुंबांना रेशन मिळत नसल्यामुळे यांच्यासमोर उद्भवलेल्या समस्याच्या अनुषंगाने त्यांना तात्काळ ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड देणे, त्याद्वारे अन्नधान्य वाटप करणे यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे पाठपुरावा करत असल्याचेही मंत्री महोदयांनी सांगितले. आदिवासीच्या जीवनाशी संबंधित योजना राबविणार आदिवासी विकास विभागासमोर आदिवासी जगवण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा असून यासाठी केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या निधीचा वापर करून त्याचे पुनर्नियोजन करून या पुढील काळात फक्त आदिवासींच्या जीवनाशी संबंधित हिताच्या योजना राबविण्यात येतील. यासाठी केंद्रीय निधीच्या सध्या चालू असलेल्या व अद्याप सुरू न झालेल्या सर्व योजनांचा फेरआढावा घेण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांना वीस दिवसांपूर्वीच देण्यात आले असल्याचे व आदिवासी लोकप्रतिनिधींनी केलेल्या विविध सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे मंत्री के. सी. पाडवी यांनी सर्व उपस्थित लोकप्रतिनिधींना सांगितले....
जळगाव-(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसात शहरातील ज्या भागात कोरोना संसर्ग बाधित रुग्ण आढळून आले आहेत तो परिसर महानगर पालिकेने कोरोना संसर्ग...
पुणे दि.१० :- पुणेविभागातील 1 हजार 23 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार...
मुंबई दि. १० : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर...
तीन रूग्ण बरे झाल्याने दिला डिस्जार्ज टाळ्यांच्या निनादात रुग्णांना निरोप बुलडाणा, (जिमाका) दि. 10 : कोरोना विषाणूने सर्वांना अस्वस्थ करून सोडले...
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती पुणे, दि १० : लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या निवारागृहात असलेल्या उत्तर प्रदेशातील १ हजार १३१ नागरिकांना...
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले लॉकडाऊन सुरू होवून ४५ दिवस झाले तरी मुलुंड, भांडूप, पवई मधील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या आटोक्यात येत...
मुंबई, दि.१० : कृषी पंपांसाठीचे मार्च २०१८ पासून प्रलंबित असलेले नवीन वीज जोडणी धोरण लवकरात लवकर अंतिम करण्याच्या सूचना ऊर्जामंत्री डॉ.नितीन...
उस्मानाबाद,दि.10 (जिमाका):- भारतीय स्टेट बँकेने जिल्ह्यातील स्टेट बँकेचे सर्व कर्जदार शेतकरी सभासद व महिला बचत गटांसाठी दहा टक्के अतिरिक्त कर्ज...
सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.
Powered By Tech Drift Solutions.