शहीद बडोले यांच्या कुटुंबियांना १ कोटीची आर्थिक मदत
नागपूरदि.२६ : जम्मू कश्मीरमध्ये कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलेले शहीद सहायक उपनिरीक्षक नरेश उमराव बडोले यांच्या कुटुंबीयांना आज ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली. विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये कोरोना संसर्ग संदर्भात आढावा बैठक झाल्यानंतर पालकमंत्री श्री. नितीन राऊत यांनी शहीद बडोले यांच्या कुटुंबीयांशी संवाद...